गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा

by India Darpan
जुलै 25, 2020 | 10:38 am
in संमिश्र वार्ता
0
pune 750x375 1

गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निर्देश

पुणे ः गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेऊन गुन्हेगारी रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीस पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सह पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, मितेश घट्टे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गृहमंत्री श्री.देशमुख यांनी कोरोना आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेली परिस्थिती जाणून घेतली. पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी पुणे शहर पोलिसांनी हद्दपार आरोपीतांकरीता केलेल्या “ExTra” (Tracking of Externees) अॅपची  माहिती दिली. पुणे शहरामधून हद्दपार झालेल्या इसमास त्याने पुन्हा पुणे शहरात येऊन गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता  “ExTra” (Tracking of Externees) अॅप विकसित करण्यात आले आहे. त्याच्या अंमलबजावणीची सुरूवात करण्यात आली आहे.

या अॅपमुळे हद्दपार गुन्हेगारास गुन्हेगारी कृत्य करण्यापासून परावृत्त करण्याचा मुख्य उद्देश साध्य होईल. हद्दपार आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे सोयीचे होईल. हद्दपार गुन्हेगारावर निगराणी / देखरेख ठेवता येईल. कमी मनुष्यबळामध्ये परिणामकारकरित्या गुन्हेगारावर निगराणी ठेवणे शक्य. हद्दपार आदेशाचे उल्लघंन होवून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी होवून पोलीस तपास यंत्रणेवरील अतिरिक्त ताण कमी होण्यास मदत होईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हेगार हद्दपार कालावधीमध्ये वास्तव्यास असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये देखील नमूद गुन्हेगारावर प्रभावी निगराणी ठेवू शकतील, असे बच्चन सिंग यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील यांनी “स्मार्ट पोलिसिंग” बाबत माहिती दिली. बैठकीस इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्याच्या अनेक भागात दमदार पाऊस

Next Post

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यावर

Next Post
NPIC 202072516548

मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७३ टक्क्यावर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011