गुणवंत खेळाडुंसाठी आर्थिक सेवावृत्ती
भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे गुणवंत खेळाडूकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे आणि सक्रीय क्रीडा करियरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे ही एक महत्वाची योजना आहे.
ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि जागतिक स्तरावरील स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.
योजनेसाठी अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवाशी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्डकप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळ प्रकार) स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्य प्राप्त, गुणवंत खेळाडूस मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच 30 वर्षे किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख यापैकी नंतरच्या दिवसापासून पेन्शन देय असेल आणि त्याच्या,तिच्या आयुष्या दरम्यान कायम राहील, परंतु अशी पेन्शन लागू करतांना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झाले असतील.









