रविवार, जून 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुड न्यूज! ताडोबातील पर्यटन सफारी सुरू; ऑनलाईन आरक्षण उपलब्ध

by India Darpan
सप्टेंबर 18, 2020 | 1:15 am
in राज्य
0
TVP

चंद्रपूर – येथील जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी दिनांक १ ऑक्टोंबर पासून नियमीतपणे सुरु करण्यात येत आहे. या पर्यटनाची सुरुवात राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार होणार असल्याची माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व्याघ्र प्रकल्पातील सफारी देखील बंद करण्यात आली होती. परंतु आता व्याघ्रप्रेमींना पर्यटन सफारीचा आनंद लुटता येणार आहे. शासनाच्या सर्व नियमाचे पालन करून व्याघ्र प्रकल्प सुरु करत असल्याचे रामगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

यांनाच मिळणार प्रवेश

ओपन जिप्सी वाहनात एक वाहनचालक, एक मार्गदर्शक व चार पर्यटक एवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच दहा वर्षांखालील व ६५ वर्षांवरील व्यक्तींना तसेच गर्भवती महिलांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करणे प्रत्येकास बंधनकारक असणार आहे. प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान थर्मर स्क्रिनींग, ईन्फ्रारेड थर्मामीटरने तपासले जाणार आहे. ताप, सर्दी, खोकला असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेली व्यक्ती आढळून आल्यास संबंधित माहिती नजिकच्या कोविड रुग्णालयात दिली जाणार आहे. मास्क शिवाय कोणत्याही सफारीसाठी प्रवेश दिला जाणार नाही. पर्यटक वाहनात बसण्यापूर्वी सॅनिटायझरने हात निर्जंतुक करणे बंधनकारक असणार आहे. जिप्सीधारकांनी देखील प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफसफाई व सॅनिटाईजेशन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

येथे करा ऑनलाईन आरक्षण
पर्यटकांकरीता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा www.mytadoba.org संकेतस्थळावर आज (१६ सप्टेंबर) पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यामध्ये बफर क्षेत्रातील विविध अँक्टिव्हिटीचे आरक्षण पर्यटकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येणार आहे. पर्यटन शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पूर्वीप्रमाणे पर्यटनाचे दार आकारले जाणार आहे. पर्यटनाबाबत अधिक माहिती करीता ०७१७२-२७७११६ व ७५८८०६३४६३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कांदा निर्यातबंदी विरोधात आजपासून सोशल मीडियाद्वारे तीव्र आंदोलन

Next Post

सलाम! पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणीला जीवदान  

India Darpan

Next Post
11

सलाम! पोलिसांच्या तत्परतेमुळे तरुणीला जीवदान  

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती अनपेक्षित घडामोडीमुळे त्रस्त होणार, जाणून घ्या, सोमवार, २३ जूनचे राशिभविष्य

जून 22, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा होणार विकास….

जून 22, 2025
World Olympic Day chief Guest welcome by Nashik Sports Persons 1

पद्मश्री पुरस्कार, अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते हॉकीपटू जफर इक्बाल यांचे नाशिकमध्ये आगमन…

जून 22, 2025
rain1

राज्यात पुढील काही दिवसात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता

जून 22, 2025
Untitled 74

महिलांच्या सशक्तीकरणाची नवी चळवळ…..‘बहिणाई मार्ट’च्या भूमिपूजनाने स्वावलंबनाचा नवा अध्याय सुरू

जून 22, 2025
CrestEH6T

भारतीय नौदलाच्या ताफ्यात ही युद्धनौका सामील होणार; रशियात होणार समारंभ

जून 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011