नवी दिल्ली – कोरोना लस चाचण्यांमध्ये कोरोना लसबद्दल चांगली माहिती मिळाली असून जर्मन लस मानवांवर परिणामकारक ठरली असल्याचे वृत्त आहे. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. तर दुसरीकडे, त्याच्यावर अनेक देशात लस शोधण्यात यश मिळाल्यानंतर आता आणखी चांगली लस चाचणीत यश मिळत असल्याचे दिसते.
काही संशोधकांना अशी अपेक्षा आहे की, विविध देशांच्या सरकारांना त्यांच्या नागरिकांसाठी सुरक्षित आणि प्रभावी लस उपलब्ध असेल. रशिया आणि चीननंतर भारत, ब्रिटन आणि अमेरिकेसह अनेक देशांच्या कंपन्यांनी या लसीवर यश मिळविले आहे. या मालिकेत, जर्मन बायोटेक कंपनी क्युरॅकने दावा केला आहे की, त्याची कोरोना लस मानवांवर प्रभावी ठरली आहे.
जर्मन संशोधकांनी सांगितले की, या लसीने अंतरिम चाचणीच्या आकडेवारीवर आधारित मानवावर चांगला परिणाम केला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी फ्रांझ-वर्नर हॉज यांनी निवेदनात म्हटले आहे की, या डेटामुळे आम्ही खूप उत्सुक आहोत. सदर कंपनी या वर्षाच्या अखेरीस मोठ्या प्रमाणात लसीची मानवी चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहे.
क्युअरव्हॅक कंपनीच्या या लसीचे नाव सीव्हीएनसीओव्ही आहे. सुरुवातीच्या चाचणीत ही लस यशस्वी असल्याचे सांगितले जाते. या लसीच्या डोसनंतर स्वयंसेवकांनी चांगला परिणाम दिसून आला. कारण कंपनीच्या म्हणण्यानुसार, फेज वन चाचणी प्रयोगामध्ये आतापर्यंत 250 हून अधिक लोक सहभागी झाले आहेत.