मुंबई – कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे ७०० रुपये कमी करण्यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या १२०० रुपयांमध्ये करता येणार आहे.
राज्यात माहिनाभरापूर्वी चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पुन्हा एकदा कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत. सामान्यांना दिलासा देण्यासाठी नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी १२००, १६०० आणि २००० रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आता आकारता येणार नाही.