नवी दिल्ली – बँकेच्या ग्राहकांसाठी खुषखबर आहे. रिअल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस)ची सुविधा आता संपूर्ण आठवडाभर आणि दिवसाचे २४ तास उपलब्ध होणार आहे. हा लाभ आज रात्रीपासून मिळणार आहे. अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करुन देणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या सुविधेविषयी माहिती दिली होती. आरटीजीएस सिस्टम मुख्यतः पैशाच्या व्यवहारासाठी असून आरटीजीएसमार्फत पाठविण्याची किमान रक्कम जास्तीत जास्त मर्यादा न ठेवता २ लाख रुपये आहे. या हस्तांतरणामध्ये लाभार्थी बँकेकडून व्यवहार झाल्यावर, पैसे हस्तांतरित करण्याची सूचना त्वरित प्राप्त होते आणि पैसे त्वरित येतात. सध्या प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवार वगळता आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आरटीजीएस ग्राहकांना उपलब्ध आहे.