नाशिक – दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे.सह्याद्री क्लस्टर अंतर्गत जानोरी गाव यामध्ये सहभागी करण्यात आले आहे. देशभरातील एकूण सहा गावांची निवड यासाठी करण्यात आली होती. यातील जानोरी हे महाराष्ट्रातील एकमेव गावाची निवड करण्यात आली आहे.
असा होणार फायदा
सुरवातीला टाटा व सह्याद्री कंपनी तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जानोरी ग्रामपंचायत या चारही संस्था मिळून गावाची पहाणी करून जानोरीत ही योजना यशस्वी करण्यासाठी गावातील पाणीपुरवठ्याची प्रत्येक गल्लीतील व प्रत्येक वस्तीवरील पाणीपुरवठा पाईप लाईनची माहिती घेऊन प्रत्येक पाणीपुरवठ्याच्या मेन पाईप लाईनला सेन्सर व मीटर बसवण्यात आले आहे. प्रत्येक वस्तीतील पाच ते सहा घरातील नळ पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनला मीटर बसवण्यात आले आहे. तसेच सर्व मीटरला सेंसर बसवल्यामुळे या मीटर मधून दररोज किती स्पीडने पाणी जाते व दररोज किती पाणी वाया जाते. तसेच गावात किती शुद्ध पाणी पुरवठा होतो. कोणत्या विभागात पाणी कमी जाते. कोणत्या विभागात पाणीपुरवठा ची पाईपलाईन लीक आहे. तसेच एका कुटुंबाला दररोजचा किती पाणी पुरवठा होतो. हे सर्व जानोरी ग्रामपंचायत कार्यालयात स्क्रीनवर दिसणार तसेच मोबाईलवर मेसेज येणार त्यामुळे जानोरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत चालू आहे का नाही? हे पण समजणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून जानोरी ग्रामपंचायत गावासाठी दररोज किती पाणी घेते व ते पाणी किती शुद्ध आहे. गावाला तेवढे पाणी जाते का नाही? ? हे पण या मीटरद्वारे व सेन्सरमुळे समजणार आहे. त्यामुळे गावाची पाण्याची बचत पण होणार आहे. ही योजना जानोरी गावात यशस्वी झाली तर महाराष्ट्रत नव्हे तर, पूर्ण भारतात टाटा कपंनी ही योजना राबविणार आहे.
यांचे परीश्रम
ही योजना यशस्वी करण्यासाठी टाटा कंपनीचे प्रणय सिन्हा, विश्वजीत दत्ता, गिरीश बी. टी, शशांक रेड्डी, व्यंकटेश आर्वे, सह्याद्री कंपनीचे संचालक विलास शिंदे, सुरेश नखाते, तेजस पिंगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महुआ बॅनर्जी, टाटा कंपनीचे मॅनेजर संदीप शिंदे, मनीष सिंग, जानोरी सरपंच संगीताताई सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ, विष्णुपंत काठे, दत्तात्रय घुमरे, अशोक केंग, ग्रामसेवक केके पवार, पाणीपुरवठा कर्मचारी सुनील बोस, योगेश रोंगटे आधी कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली आहे.
एका क्लिकवर शुद्धता
प्रत्येक घरी स्वच्छ आणि योग्य प्रमाणात पाणी पोहोचवीणे तसेच लोकांची पाण्यासाठीची वणं वण थांबावी या साठी केंद्रसरकरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे पायलट प्रोजेक्ट युनिट जानोरी येथें कार्यान्वित करण्यात आले, या प्रकल्पामुळे प्रत्येक घरात किती पाणी येते व त्याची शुद्धता किती हे एका क्लिकवर समजणार आहे. या साठी टाटा उद्योग समूहाने पायलट प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे.
– विलास शिंदे, संचालक, सह्याद्री फार्म्स.
गावकऱ्यांची मदत
महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात एकमेव जानोरी गाव हे अतिशय सुंदर आहे. जानोरी ग्रामपंचायत ने गावासाठी प्रत्येक योजना यशस्वी करून दाखवली आहे. गावात जल जीवन मिशन अंतर्गत स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना राबवण्यासाठी अतिशय आनंद झाला आहे. योजना करण्यासाठी गावकऱ्यांनी अतिशय मदत केली आहे. त्यामुळे या गावचे नाव कधीच विसरणार नाही.
– प्रणय सिन्हा, टाटा ट्रस्ट
जानोरी गावाविषयी
• सुरक्षा
• उच्च आनंद निर्देशांक असणारे आगळे वेगळे गाव…
• सीसीटीव्ही कॅमेरा
• प्रत्येक लेनवर स्ट्रीट लाईट
• गर्दीच्या ठिकाणी हायमास्ट
• जन सेवा
• वेळेत विद्युत सेवक आणि जलसेवक उपलब्ध
• रोज सकाळी कचरा संकलन
• गो ग्रीन
• भूमिगत गटार आणि सांडपाणी प्रक्रिया
• सार्वजनिक स्वच्छतागृहासाठी पाण्याची सुविधा
• संपूर्ण कचर्याची विल्हेवाट
• ग्रामपंचायत सर्वांसाठी
• रोज सकाळी ९.०० वाजता सुरवात
• संपूर्ण गाव सीसीटीव्ही द्वारे देखरेख
• स्वतंत्र सार्वजनिक मीटिंग सभागृह