नवी दिल्ली – बहुप्रतिक्षीत असलेल्या कोरोनावरील लस वर्षारंभीच येणार आहेत. केवळ एक नाही तर २ ते ३ लस भारतीयांसाठी उपलब्ध होणार आहेत. येथील एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी तसे स्पष्ट केले आहे. तसेच देशातील सर्वच नागरिकांना ही लस देण्याची गरज राहणार नाही. केवळ ५० ते ६० टक्के जणांना लस दिल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल, असेही डॉ. गुलेरिया यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.
देशातील कोरोना लसीच्या चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. आगामी २ ते ३ महिन्यात ही सर्व प्रक्रीया पूर्ण होऊन लस उपलब्ध होईल. वर्षाच्या सुरुवातीलाच या २ ते ३ येतील, असेही त्यांनी सांगितले आहे.