नवी दिल्ली – भारतीय बनावटीची लस कोव्हॅक्सिनला तज्ज्ञांच्या समितीने मंजूर दिली आहे. हैदराबाद येथे या लसीची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. त्यामुळे कोविशिल्ड पाठोपाठ मंजुरी मिळालेली कोव्हॅक्सिन ही दुसरी लस आहे. आता या दोन्ही लसींना डीसीजीआयची मान्यता आवश्यक आहे. ती मिळाल्यानंतर या दोन्ही लसी देशात लसीकरणासाठी उपलब्ध होऊ शकतील.
ऑक्सफर्डच्या कोविशिल्ड पाठोपाठ आता बायोटेकची कोव्हॅक्सिन ही सुद्धा सर्व चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाली आहे. भारत बायोटेक आणि एनआयव्ही, पुणे यांनी ही लस विकसित केली आहे. या दोन्ही लसींना डीसीजीआयने मान्यता दिल्यानंतर एकाचवेळी त्या देशभरात उपलब्ध झाल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.