मुंबई – वर्ष २०२० हे अनेक चित्रपट ताराकांसाठी खास राहिलेले आहे. अनेकजण आपले सिंगलहूड संपवत विवाहबंधनात अडकले तर अनेक विवाहित सेलेब्रिटी जोडप्यांनी आपल्या कुटुंबात नव्या पाहुण्याचे स्वागत केले. यापैकी खूपच लोकप्रिय सेलिब्रिटी कपल असलेल्या दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी मात्र आपल्या घरात सध्यातरी पाळणा हलणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका इंटरव्ह्यू दरम्यान जेव्हा दीपिकाला मुलांबद्दल विचारले गेले तेव्हा तिने स्पष्ट केले की सध्या तरी रणवीरसह तिचे लक्ष सध्या करिअरवर असून मुलांना सांभाळण्यासाठी दोघेही अजून मानसिक दृष्ट्या तयार नाहीत. दीपिका पुढे म्हणाली की मुलांना जन्म देणे आणि संभाळणे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मोठा निर्णय आहे. तिच्या मते याआधी दोन्ही पालकाना मानसिकदृष्ट्या तयार असणे आवश्यक आहे. तरच ते पुढचा विचार करू शकतात.
दीपिकाने बॉलीवुड मध्ये आपला डेब्यू सन २००७ या वर्षी ओम शांति ओम चित्रपटासह शाहरुख खानबरोबर केला होता. हा चित्रपट सुपरहिट तर झालाच शिवाय, त्यात दीपिकाच्या अभिनयाची खूप वाहवा सुद्धा झाली. यानंतर दीपिकाने एकापाठोपाठ एक सुपर हिट चित्रपटांची रांग लावली. सध्या दीपिका लवकरच शाहरुख खान बरोबर पठान चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय शकून बात्राच्या एका चित्रपटात सुद्धा दीपिका दिसणार आहे. यात दीपिका सोबत नायक सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे असतील. या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान तिने शेअर केलेले काही फोटोज नुकतेच व्हायरल झाले आहेत.
रणवीर बद्दल सांगायचे झाल्यास आता भारताच्या पहिल्या विश्वचषक क्रिकेट विजयावर आधारित ८३ चित्रपटात रणवीरने कपिल देव ची भूमिका केली आहे. यात दीपिकासुद्धा एका स्पेशल भूमिकेत दिसणार आहे.
सध्या बॉलीवूड मध्ये करीना कपूर आणि अनुष्का शर्मा या अभिनेत्री गर्भवती असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला या दोघीही आपल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.