मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाची (एलआयसी) बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी प्राप्त होणार आहे. एखाद्याची पॉलिसी लॅप्स झाली असेल तर ती रिव्हाईव्ह (पुन्हा सुरू) करण्यासाठी आणखी एक संधी आहे. एलआयसीने कोरोना संक्रमणातील परिस्थितीचा विचार करून लॅप्स झालेली पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची संधी दिली आहे.
७ जानेवारी ते ६ मार्च २०२१ या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा ही योजना उपलब्ध नसेल. त्यासाठी एलआयसीने आपल्या १ हजार ५२६ कार्यालयांमध्ये ही सुविधा ठेवली आहे. एलआयसीने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, या योजनेंतर्गत त्याच प्लानचा समावेश करण्यात आला आहे ज्यांचे प्रिमियम पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून पेंडींग नसेल. अर्थात अनेक अटी व नियम त्यासाठी ठेवण्यात आले आहेत. आरोग्याशी संबंधित स्थितीमध्येही सुट देण्यात आली आहे. बहुतांश पॉलिसी केवळ उत्तम आरोग्याशी संबंधित घोषणापत्राच्या आधारावरच रिव्हाईव होणार आहेत. याशिवाय प्रपोजर किंवा जीवन विमा करणाऱ्यांना कोव्हीड-१९ शी संबंधित प्रश्नांची उत्तरे द्यावी लागण्याची शक्यता आहे. विलंब शुल्कावर कंपनीने सध्या तरी सुट दिली आहे. पण टर्म विमा, आरोग्य विमा, मल्टीपल रिस्क पॉलिसी आदींवर ही सूट नसणार आहे.