मुंबई – गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या भयानक विषाणूमुळे जगभरातील सुमारे १३ लाखांपेक्षा जास्त जण मृत्यूमुखी पडले आहे, तर पाच कोटी पेक्षा अधिक जण बधित झाले आहेत. भारत सुमारे १ लाख २८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या आजारावर प्रभावी लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. भारतात देखील या लसीवर संशोधन सुरू आहे. पुढील महिन्यात देशाला कोरोना लसचे १०० दशलक्ष डोस मिळू शकतात, असा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर्श पूनावाला यांनी केला आहे.
युरोप अमेरिकेसह जगभरातील अनेक देशात कोरोनावर प्रभावी लस शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. सीरम संस्था ही लस तयार करण्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाची भागीदार आहे. अॅस्ट्रॅजेन्का ऑक्सफोर्ड विद्यापीठ या औषधी कंपनीच्या सहकार्याने ही लस तयार केली जात आहे. या संदर्भात
पूनावाला म्हणाले की, लसचे प्रारंभिक उत्पादन भारतासाठी होईल आणि त्याचा परिचय घेऊन लसी वितरण प्रणाली लागू केली जाईल. ते पुढे म्हणाले, पुढील वर्षाच्या सुरूवातीच्या लसीला मंजुरी मिळाल्यानंतर, इतर दक्षिण आशियाई देशांनाही डोस पाठविला जाईल. सीरम इन्स्टिट्यूट या लसचे १०० दशलक्ष डोस तयार करेल, ज्यात भारतासाठी ५० दशलक्ष आणि इतर दक्षिण आशियाई देशांसाठी ५० दशलक्ष आहेत. सीरम संस्थेने आतापर्यंत या लसीचे ४० दशलक्ष डोस तयार केले आहेत.