नाशिक शहरात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या वतीने सुरु असलेल्या सीएनजी व पीएनजी भूमिगत गॅस पाईप लाईन व प्रकल्पाबाबत आज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील कार्यालयात प्रकल्पबाबत आढावा घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती जाणून घेतली.यावेळी नाशिक शहरातील आतापर्यंत २५ हजार ग्राहकांनी पीएनजी घरगुती गॅस जोडणी बाबत नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास २० हजार घरांतील गॅस पाईपलाईन जोडणीचे काम पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी यांनी दिली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ,उपस्थित होते. सीएनजी स्टेशनच्या माध्यमातून शहरातील फोर व्हीलर वाहने तसेच बसेसला गॅस उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर औद्योगिक वापरासाठी देखील गॅस उपलब्ध होणार आहे.या सर्व प्रकल्पाच्या कामकाजाची भुजबळ यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे प्रकल्प अधिकारी संदीप श्रीवास्तव, अभियंता आदित्य रामदासी यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर ही कामे पूर्ण करून नागरिकांना गॅसच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केलेल्या आहे.