नाशिक – लॉकडाऊनमुळे बंद झालेली सिटी बससेवा अखेर आजपासून (२२ ऑक्टोबर) सुरू होणार आहे. तशी घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. शहर बससेवा महापालिकेने चालवण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे महामंडळ सेवा सुरू करणार की नाही, याबाबत साशंकता होती. मात्र, आता महामंडळाने ही सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळणार आहे.
खालील मार्गावर धावणार बस
१) निमाणी ते नाशिक रोड
२) निमाणी ते श्रमिक नगर
३) निमाणी ते उत्तम नगर
४) निमाणी ते अंबड
५) निमाणी ते विजयनगर
६) निमाणी ते पाथर्डी गाव