नाशिक – शहरासह जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी सूजर मांढरे यांनी मोठा खुलासा केला असून हा पुरवठा सुरळीत झाला आहे. तसेच, उद्योगांनाही तो उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सद्यस्थितीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन वापरावर योग्य नियंत्रण स्थापित करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील ऑक्सीजन उत्पादन देखील वाढवण्यात येऊन त्याची वाहतूक सुरळीत करण्यात आलेली आहे. आता ज्या उद्योगांचा ऑक्सिजन वापर अतिशय कमी आहे अशा सर्वांना परवानग्या दिल्या जात आहेत. ज्यांना परवानगीची आवश्यकता आहे त्यांनी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे अर्ज करावा. अत्यल्प ऑक्सीजन वापर व जास्त कामगार अशा उद्योगांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल. वैद्यकीय कारणाकरता ऑक्सिजनचा पुरवठा ही कायमच सर्वोच्च प्राथमिकता राहील, असे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्पष्ट केले आहे.
आयमाकडून स्वागत