नवी दिल्ली – व्हॉटसअॅपचे मेसेज आता चक्क शेड्युल करता येणार आहेत. म्हणजेच, एखाद्याला बर्थ डे विश करण्यासाठी रात्री १२ पर्यंत जगण्याची गरज नाही. निश्चित वेळेत तो मेसेज संबंधित व्यक्तीला मिळणार आहे. दरम्यान, व्हाट्सअॅप सातत्याने युजर्ससाठी काही ना काही अपडेट उपलब्ध करुन देत असते. आताही दोन फिचर्स लवकरच उपलब्ध होणार आहेत.
शेड्यूल मेसेजसाठी तुम्हाला थर्ड पार्टी ऍपची मदत घ्यावी लागणार आहे. कारण सध्या तरी यावर अशापद्धतीने नंतरचे मेसेज पाठवण्याची सुविधा उपलब्ध नाही. यासाठी सर्वप्रथम SKEDit ऍप डाऊनलोड करायला हवं. त्यानंतर तिथे लॉग इन करा. त्याच्या मेनू मध्ये गेल्यावर तुम्हाला व्हॅट्सऍपचा पर्याय दिसेल, तो निवडा. ऍक्सेस इनेबल करून पुन्हा SKEDit मध्ये जाऊन toggle ऑन करा. त्यानंतर परवानगी देऊन पुन्हा व्हॅट्सऍपमध्ये या. तेथे तुम्हाला ask me before sending हा पर्याय दिसेल. हे जर तुम्ही ऑन केले तर ठरलेल्या वेळी मेसेज पाठवला जाण्याच्या आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुम्ही त्यावर टॅप केल्यानंतरच हा मेसेज जाईल. पण तुम्ही जर ते ऑफ ठेवलंत तर मेसेजच्या वेळी मेसेज आपोआप सेंड होईल.
थोडक्यात काय, तर आता कोणाला रात्री १२ वाजता वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील तर तोवर जगायला नको आणि शिवाय तुमचं इम्प्रेशनही पडेलच की, काय.
हे दोन फिचर्स लवकरच येणार
अन्य दोन फीचर्स व्हाट्सअपवर लवकरच येणार आहेत. यावर सध्या archived chat असा पर्याय आहे. लवकरच त्याचे नाव बदलून ते रीड लॅटर असे ठेवण्यात येणार आहे. हे फीचर ऍक्टिव्हेट केलं की तुम्ही निवडलेल्या कॉन्टॅक्ट्स कडून तुम्हाला येणाऱ्या मेसेज किंवा कॉलचे नोटिफिकेशन मिळणार नाहीत. हे फीचर युझर्स जेव्हा हवं तेव्हा ऍक्टिव्हेट आणि डिऍक्टिव्हेट करू शकतात.
म्यूट व्हिडीओ
म्यूट व्हिडीओ हे एकी खास फिचर आहे. या फीचरच्या माध्यमातून युझर्स व्हिडीओ पाठवण्याच्या आधी म्यूट करू शकतात. सध्या याची चाचणी सुरु आहे. लवकरच हे फिचर रुजू होण्याची शक्यता आहे.