नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणूक २०२० चा निकाल काहीही असो, परंतु गुगल सर्चमध्ये तेजस्वी यादव यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मागे टाकले आहे. १० नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ पासून गूगल सर्चमध्ये तेजस्वी यादव नितीशकुमारपेक्षा पुढे आहे. दुपारी अडीच वाजता नितीशकुमार यांचा शोध घेण्याचे सरासरी प्रमाण ९ होते, तर तेजस्वी यादव यांची सरासरी संख्या ४३ होती. पहाटे ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत नितीशकुमार आणि तेजस्वी यादव यांचा शोध घेण्यासाठी अनुक्रमे २३ आणि ४६ होती. मतमोजणीची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसे गूगलमध्ये तेजस्वी यादव यांचे शोध वाढत आहेत.
ट्रेंडनुसार, गेल्या काही तासांत यादव या कीवर्डच्या शोधात १४०% वाढ झाली आहे, तर नितीश कुमार या कीवर्डच्या शोधात ८०% वाढ झाली आहे. माकपचे स्टार प्रचारक कन्हैया कुमार यांच्या शोधात १८० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बिहारच्या सीएम कीवर्ड सर्चमध्ये ६०% वाढ झाली आहे.
बिहार विधानसभा २०२० चे निकाल येत आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. यावेळी बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी तेजस्वी यादव यांनी २१ दिवसांत २५१ सभा घेतल्या आहेत. म्हणजेच तेजस्वीने दररोज सरासरी १२ सभा घेतल्या. बिहार विधानसभा निवडणुकीतील बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात पाच पक्षांच्या महागठबंधनच्या विजयाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, परंतु वास्तविक परिस्थिती संध्याकाळपर्यंतच स्पष्ट होईल.