मुंबई – प्रवासादरम्यान आपल्यापैकी अनेक लोक हमखास गुगल मॅप्सचा उपयोग करतात. आता गुगल मॅप्समध्ये एक नवीन फिचर जोडले जाते आहे. या नव्या फिचरमुळे विविध व्यावसायिकांना फायदा होईल तसेच सामन्य युजर्स आजूबाजूच्या व्यावसायिकांशी संपर्क करू शकतील. याशिवाय गुगल मॅप्सच्या एक्सपलोर टॅब मध्ये कम्युनिटी फीड नावाचे फिचर सुद्धा जोडण्यात आले आहे. यात लेटेस्ट रिव्ह्यू, फोटोज, पोस्टची जागा, आणि पुढे येणारे इव्हेंट्स इत्यादींची माहिती दिसू शकेल. ओस्बतच यामध्ये एक्सपर्टस द्वारा आलेल्या कमेंट्स जसे की फूड आणि ड्रिंक मर्चंट, पब्लिशिंग हाउस बद्दल चे आर्टिकल्स इत्यादी सुद्धा पहायला मिळतील. नवीन फिचरद्वारे आपल्याला आजूबाजूला होणारा इव्हेंट्सची रिअल टाईम माहिती मिळू शकेल.
ग्राहक आणि व्यावयासिक यांच्यातील संपर्क वाढेल
गुगलच्या मते नवीन फिचर्समुळे ग्राहक आणि आजूबाजूच्या भागातील विविध व्यावयासिक यांच्यातील संवाद वाढायला मदत होईल. या फिचरमुळे बिझनेस संबंधी मेसेजेस मध्ये वृद्धी झाल्याचेही गुगलचे मत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला अनेक लोकांनी या नवीन फिचरचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या व्यावसायिकाचा शोध घेऊन दोनहून अधिक वेळी त्यांच्याशी संपर्क केल्याचे गुगल सांगते.
अॅन्ड्रॉइड आणि IOS दोन्हीसाठी
गुगल मॅप्स मधील प्रस्तुत फिचर हे अॅन्ड्रॉइड आणि IOS या दोन्ही युजर्स करीता उपलब्ध असणार आहे. सूत्रांच्या मते कंपनी लवकरच हे दोन्ही फिचर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर युजर्सच्या वापराकरिता खुले करणार आहे.
गुगल मॅप्स मधूनच मिळेल ग्राहकांना रिप्लाय
यात केवळ ग्राहकच व्यवसायीकांचा शोध घेऊ शकतील असे नाही तर व्यावासायिकदेखील ग्राहकाना रिप्लाय करू शकतील. लवकरच बिझनेस म्हणून रजिस्टर्ड असलेल्या व्यावसायिकांना ग्राहकांशी बातचीत करता यावी यासाठी मेसेज नावाचे एक बटन उपलब्ध करून दिले जाईल ज्यावर क्लिक करून ते आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधू शकतील.
पुढील वर्षीपर्यंत या फिचर मध्ये एक अपडेट येण्याची शक्यता आहे. यानंतर किती लोकांनी तुमचा बिझनेस सर्च केला हेदेखील तुम्ही या माध्यमातून पाहू शकाल.