नवी दिल्ली – जीमेल धारकांसाठी आता ३१ मार्च २०२१ पर्यंत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अँप २४ तासांपर्यंत सुरू ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी गुगल मीटसाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता सर्व निर्बंध उठवण्यात आले असून मार्च २०२१ पर्यंत ग्राहकांना व्हिडियो कॉन्फरन्स करता येणार आहे.
एप्रिलमध्ये घोषित केलेल्या नियमानुसार ३० सप्टेंबर पर्यंत ग्राहकांना केवळ १०० लोकांच्या उपस्थितीत सुविधेचा लाभ घेता येणार आहे. ३० सप्टेंबर पर्यंत त्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र आता गुगल तर्फे हि मुदत वाढवण्यात आली आहे. ३१ मार्च २०२१ पर्यंत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुले आता फ्री व्हिडियो कॉलच्या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. सुटीच्या वेळेस व्हिडीओद्वारे होस्ट केलेले कौटुंबिक कार्यक्रम, कार्यालनीय बैठका यासारखे अनके कार्यक्रम गुगल मीटवर करण्यात आले. त्यामुळे हि सुविधा खंडित न करता ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरु ठेवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे गुगल मीटचे ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर समीर प्रधान यांनी सांगितले. याआधी एकावेळी ५० ते १०० जण सहभागी होत असल्याचे दिसून आले मात्र आता २५० जणांना एकाचवेळी सहभागी होता येणार आहे. गुगल ड्राइव्हवर रेकॉर्डिंग जतन करण्याची सुविधा असल्याने त्याचा देखील वापर झाल्याचे निदर्शनास आले आहे.