नवी दिल्ली – गुगल मीटमध्ये प्रश्नोत्तर यासारख्या नवीन फीचरचा समावेश करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळा तसेच कॉलेज ऑनलाईन सुरु असल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा सकारात्मक निर्णय गुगलने घेतला आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी आणि त्यातील सुसंगतता वाढण्यासाठी हे फिचर नक्की उपयुक्त ठरणार असल्याचे गुगलने स्पष्ट केले आहे. होस्ट आणि इतर सद्य प्रथम प्रश्न आणि उत्तर या पर्यायाचा वापर करत असत. मात्र, संपूर्ण मिटिंग दरम्यान झालेले प्रश्न आणि उत्तर थेट ईमेलवर प्राप्त होणार आहे. ज्यात सबमिट केलेल्या प्रश्नांचा समावेश असणार आहे. प्रत्येकासाठी गुगलद्वारे प्रश्न सबमिट करणे अनिवार्य केले जाणार आहे. हे फिचर ८ ऑक्टोबरपासून युझर्ससाठी सुरु होणार आहे. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये या संबंधी अधिकृत माहिती दिली आहे.