नवी दिल्ली – बँकेतून एखादा व्यवहार केला तर त्याचा काही न काही रेकॉर्ड स्टेटमेंटच्या माध्यमातून आपल्याकडे असतो. अशाचप्रकारची सुविधा आता गुगल पे देखील देणार आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी गुगल पेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो.
या नवीन मिळणाऱ्या सुविधेमुळे तुम्हाला वर्षभराचा आलेख पाहता येईल. २०२० चा विचार करता १९ डिसेंबर २०२० पर्यंत तुम्ही जो काही व्यवहार गुगल पे च्या माध्यमातून केला आहे, त्यावर आधारित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल, असे गुगलने म्हटले आहे.
अशी मिळेल माहिती
गुगल पे च्या होमपेजवर तुम्हाला रिव्ह्यूचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक केलं की, किती दिवसात तुम्ही किती आर्थिक व्यवहार केले, याची माहिती मिळेल. याशिवाय वेगवेगळ्या स्लाइड्सच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळेल. तसेच, संपूर्ण वर्षात कॅशबॅकच्या माध्यमातून तुम्ही किती पैसे वाचवलेत हे देखील कळू शकेल.