मुंबई – टेक्नॉलॉजीच्या युगात गुगल ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सर्वाधिक सुरक्षित डाटा स्टोरेज म्हणून गुगल प्रसिद्ध आहेच. परंतु, गुगल ड्राईव्हमध्ये आता मोठे बदल होणार आहेत. एखादी फाईल डिलीट झाल्यास गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह करता येत होती. मात्र आता असे होणार नाही. आता जीमेलप्रमाणेच गुगल ड्राईव्हमध्ये ट्रॅश म्हणजेच डिलीट केलेल्या फाईल फक्त ३० दिवसांपर्यंत राहणार आहेत. महिनाभरानंतर गुगलद्वारे या फाईल्स डिलीट करण्यात येतील.
गुगल कंपनीने एका ब्लॉगद्वारे ड्राईव्हच्या अपडेटबाबत माहिती दिली आहे. १३ ऑक्टोबरपासून रिटेन्शन पॉलिसीमध्ये बदल करत असून, त्यानुसार ट्रॅश फोल्डरमध्ये असलेल्या सर्व फाईल तसेच डाटा ३० दिवसांनी डिलीट करण्यात येईल, अशी माहिती या ब्लॉगमध्ये देण्यात आली आहे. याआधी गुगल ड्राईव ट्रॅशमधील फाईल्स कायमस्वरूपी सेव्ह केल्या जात. मात्र आता १३ ऑक्टोबरपासून ही सुविधा बंद करण्यात आली आहे.
गुगलच्या मते नव्या अपडेटचा फायदा युझर्सना होणार आहे. आता युझर्स केवळ त्याच फाईल्स डिलीट करतील ज्या फक्त त्यांना डिलीट करायच्या आहेत. काही दिवसांपूर्वी गुगल ड्राईव्हमध्ये मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. ज्यामुळे हॅकर ड्राईवचा चुकीचा वापर करु शकत होते. यामुळे हॅकर्स फोनही हॅक करु शकत होते. परंतु, गुगलने वेळीच हा तांत्रिक बिघाड दूर केला होता. गुगल ड्राईव्ह ऑनलाईन डाटा स्टोअरेजसाठीची सुविधा आहे. याद्वारे कोणत्याही फाईल, फोल्डर, फोटो आणि व्हिडीओ ऑनलाईन सेव्ह करणे शक्य झाले आहे.