नवी दिल्ली – जगातल्या कोणत्याही प्रश्नाची माहिती हवी असेल, काही शंका असतील तर आपण बिनदिक्कत गुगल बाबांना शरण जातो. काहीही हवं असेल की कर सर्च गुगलवर अशी आपली सवय असते. पण, ही सवय कधीतरी घटक ठरू शकते. त्यामुळे जरा सावध रहा आणि काही गोष्टी गुगलवर सर्च करू नका.
बॉम्ब बनवण्याची प्रक्रिया
गुगलवर या विषयाशी संबंधित काहीही सर्च करू नका. कारण याने तुम्ही अडचणीत याल. यामुळे तुम्हाला तुरुंगवासही होऊ शकतो. तुम्ही जर हा विषय गुगलवर सर्च कराल तर तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपचा आयपी ऍड्रेस थेट सुरक्षा यंत्रणेकडे जाईल. आणि मग कदाचित तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
औषधे
आपल्याला कोणताही आजार झाला आणि त्यावरील उपाय माहीत नसतील तर आपण गुगलवर सर्च करतो. एवढच कशाला तब्येतीसाठी काय चांगलं, काय वाईट हे देखील आपण यावर पाहतो. पण हे करणं चुकीचं आहे. कारण अशा पद्धतीने औषधं शोधणे, ती घेणे किंवा मग नेटवर वाचून आहारात बदल करणे धोक्याचं ठरू शकतं. यासाठी डॉक्टरांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने वागणंच योग्य ठरेल.
मोबाइल ऍप किंवा सॉफ्टवेअर
काही ऍप किंवा सॉफ्टवेअरची माहिती आपण गुगलवरून घेतो. डाऊनलोड देखील करतो. पण अशा पद्धतीने काही डाऊनलोड करणे हे धोकादायक ठरू शकते. यातून काही व्हायरस कॉम्प्युटर, मोबाइलमध्ये घुसू शकतात. यामुळे डाऊनलोड करण्यासाठी ज्या काही अधिकृत वेबसाईट्स असतील त्याचाच वापर करा.
कस्टमर केअर नंबर
अनेकदा बँकांचे किंवा कंपन्यांचे कस्टमर केअर नंबरही आपण नेटवर सर्च करतो. पण यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. कारण सायबर क्राईम करणारे गुगलवर खोटे नंबरही ठेवू शकतात. तुम्ही तो नंबर घेऊन त्यावर फोन कराल तर तुमचा नंबर हॅकर्स किंवा सायबर क्राईम करणाऱ्यांकडे जाईल. आणि मग तुम्ही देखील त्याची शिकार होऊ शकता.