मुंबई – गुगलने एक भन्नाट अॅप लॉन्च केले आहे. WifiNanScan असे या अॅपचे नाव असून या अॅपच्या माध्यमातून युझर ब्ल्यूटुथ आणि वायफायशिवाय आपल्या जवळचे इतर स्मार्टफोन व डिव्हाईस कनेक्ट करता येणार आहेत. फोनमध्ये नेटवर्क नसेल तरीही अॅपच्या माध्यमातून इंटरनेट आणि वायफायशी संबंधित सगळी कामे होतील. सध्या हे अॅप फक्त डेव्हलपर्ससाठी आहे.
या स्मार्टफोनला सपोर्ट करणार अॅप
जर तुम्हाला Wifi Aware च्या बाबतीत माहिती नाही तर हे एक Neighbour Awareness Networkig आहे, जे कुठल्याही एक्सटर्लन डिव्हाईसशिवाय एका स्मार्टफोनला दुसऱ्या स्मार्टफोनशी जोडण्यास मदत करते. 9to5Google च्या अहवालानुसार WifiNanScan अॅप सिलेक्टेड स्मार्टफोनवरच चालेल. अँड्रॉईड ८ आणि त्यापेक्षा हायर व्हर्जनला हे अॅप सपोर्ट करणार आहे. या अॅपच्या मदतीने ब्ल्यूटुथ आणि वायफायशिवाय मेसेज आणि डेटा शेअर करू शकणार आहेत. गुगलने दावा केला आहे की हे अॅप पूर्णपणे सुरक्षित आहे.









