युनियनला हे दिले नाव
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये गुगल कंपनीच्या २२५ अभियंत्यांनी कर्मचारी संघटना स्थापन केली आहे. अमेरिकेच्या टेक्निकल इंडस्ट्रीमध्ये असे प्रथमच घडत आहे. कारण अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कोणतीही संघटना होऊच द्यायची नाही, याकरिता दडपशाही केली आहे. या कारणामुळेच, गुगल मधील काही कर्मचार्यांनी गुप्तपणे युनियन स्थापन केली असून मागील वर्षी डिसेंबरमध्ये आपले पदाधिकारी निवडले आहेत. तसेच त्याला अल्फाबेट वर्कर्स युनियन असे नाव दिले आहे.
खुपच लहान
गुगलमधील सुमारे २ लाख ६० हजार कर्मचारी कायम किंवा करारावर काम करतात, त्यापैकी २२५ लोकांची युनियन खूप लहान मानली जात आहे, पण एक सुरुवात आहे, असे युनियनचे उपाध्यक्ष व अभियंता चिवी शॉ म्हणाले. तसेच गुगल या माध्यमातून व्यवस्थापनावर दबाव टाकून कर्मचार्यांच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी दूर होतील, असेही ते म्हणाले.
भेदभाव
वास्तविक सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना चांगले पगार मिळतात. परंतु बर्याचदा कर्मचारी आणि व्यवस्थापनात वैचारिक, वैयक्तिक व सामाजिक मतभेद आढळतात. यामध्ये लैंगिक अत्याचार आणि विविध संधी आणि कामाच्या ठिकाणी भेदभाव यांचा समावेश आहे. यापुर्वी २०१८ मध्ये, गुगलचे २० हजार कर्मचारी कार्यालयातून बाहेर आले आणि त्यांनी लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांबद्दल संस्थेच्या मनोवृत्तीचा निषेध केला होता.