मुंबई – गुगलची एक लोकप्रिय सर्व्हिस बंद झाली आहे. गुगल प्ले म्यूझिक या सर्व्हिसवर २४ फेब्रुवारीपासून गुगलने पडदा टाकला आहे. गुगलच्या वतीने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये ही सर्व्हिस बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. गुगलच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये ही सेवा दिली जात होती.
गुगल प्ले म्यूझिक ही एक एपबेस्ड सर्व्हिस आहे. याचा वापर युझर्स म्युझिक व आडियो एेकण्यासाठी करतात. मात्र आता गुगलची ही सर्व्हिस बंद झाली आहे. त्यामुळे युझर्सचा डेटाही लॉस्ट झालेला आहे. ज्यांनी एप बंद होण्यापूर्वी डेटा ट्रान्सफर केला असेल त्यांनाच फायदा झाला आहे. मात्र आता गुगल प्ले म्युझिकवरील सर्व डेटा डिलीट झालेला आहे.
युट्यूबला ट्रान्सफर करण्याची होती संधी
गुगलच्या वतीने युझर्सला आपला डेटा युट्यूबला ट्रान्सफर करण्याची संधी होती. युट्यूब म्युझिक एपमध्येही युझर्स गुगल प्ले म्युझिकप्रमाणे आपल्या लिस्टमधील गाणी एेकू शकतात. अर्थात युट्यूब म्युझिकला गुगल प्ले म्युझिकचे प्रो व्हर्जन मानले जात आहे. अर्थात ज्या युझर्सने डेटा ट्रान्सफर केला असेल त्यांनाच याचा फायदा आहे.