मुंबई – गुगल सर्च इंजिनचा वापर सर्वसाधारणपणे सारेच करतात. यात काही लोक गुगलचे प्रायव्हेट सर्च टॅब incognito मोडचाही वापर करतात. मात्र हा मोड सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतो. याच दाव्याची दखल घेत अमेरिकेतील न्यायालयात गुगलच्या विरोधात एक खटलाही दाखल करण्यात आला.
यात आरोप लावण्यात आला आहे की Google Incognito मोड चा वापर करणाऱ्या युझर्सचे लोकेशन आणि डेटाची चोरी केली जात आहे. ब्लुमबर्गच्या अहवालात असेही म्हटले आहे की कॅलिफोर्नियाचे जिल्हा न्यायाधीश लकी कोह यांनी गुगलला असे करू नये अशी तंबीच दिली आहे. गुगल क्रोमचा Incognito मोड युझर्ससाठी एक पर्याय उपलब्ध करतो, जेथून युझर्स ब्राऊजर किंवा एखाद्या डिव्हाईसवर कुठलीही अॅक्टीव्हीटी सेव्ह न करता इंटरनेट ब्राऊज करू शकतात. गुगलने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की Incognito मोड ओपन करण्यात येतो तेव्हा युझर्सला स्पष्ट सांगितले जाते की ब्राऊझिंग अॅक्टीव्हीटी कलेक्ट केली जाऊ शकते.
डेटा ट्रेकिंगचा व्यवसाय
गेल्या वर्षी जूनमध्ये अमेरिकेत क्रोम युझर्सने एक तक्रार दाखल केली होती. ज्यात आरोप करण्यात आला होता की गुगलकडे डेटा ट्रेकिंगचा मोठा व्यवसाय आहे. त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की युझरने डेटा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही कंपनी डेटा कलेक्ट करीत राहते.