नाशिक : गिरणारे ग्रामीण रुग्णालयात खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने आणि नाशिक बिल्डर असोशिएशन ऑफ इंडिया, नाशिक यांच्या मदतीने स्वंयम निर्मित ऑक्सिजन युनिट कार्यान्वित करण्यात आले. या युनिटचे गुरुवारी (दि.६) खासदार गोडसे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी माजीमंत्री बबन घोलप, जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात, तहसीलदार अनिल दोंडे, गटविकास अधिकारी संगिता बारी, अभय चौकसी, विजय बाविस्कर, भाऊसाहेब सांगळे, बी.टी. कडलग, अनिल ढिकले, वामन खोस्कर, दिलीप थेटे, नितीन गायकर, सदानंद नवले, अनिल थेटे, दत्तु ढगे, विवेक थेटे, महेंद्र थेटे, अविनाश पाटील, मनोज बाविस्कर, सरपंच अलकाताई दिवे, उपसरपंच तानाजी गायकर आदींसह नाशिक बिल्डर असोशिएशन ऑफ इंडियाचे पदाधिकारी व पंचक्रोषीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
याप्रसंगी खा. गोडसे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्याप्रमाणावर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना आपल्या प्राणांना मुकावे लागत आहे. परिणामी अनेक कुटुंब अशरक्ष: उदध्वस्त होत आहेत. ऑक्सिजनअभावी रुग्णाचा जीव जाणे ही मोठी दुर्देवी घटना आहे. आज लोकार्पण होत असलेल्या स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट उभारण्यात बिल्डर असोशिएशन ऑफ इंडिया, नाशिक केंद्र यांचे मोठे योगदान निश्चितच अभिनंदनीय आहे. बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या सामाजिक कार्याचे अनुकरण करुन विविध स्तरातील सामाजिक संस्थांनी सामाजिक बांधिलकी एकत्रितपणे पार पाडल्यास ऑक्सिजनच्या तुटवड्यावर आपण निश्चितच मात करु असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी गिरणारे येथे बोलतांना व्यक्त केला.
२५ रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन
गिरणारे येथे उभारण्यात आलेले स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट हे बडोदा येथील Airro (ॲरो) या कंपनीकडून खरेदी करण्यात आले आहे. या युनिटची ऑक्सिजन निमिर्तीची क्षमता प्रति तास ५ एन.एम.क्यू. इतकी म्हणजे ८३ लिटर अशी आहे. या युनिटमुळे सुमारे २५ रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजन उपलब्ध होणार असल्यामुळे ऑक्सिजनअभावी रुग्णांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. या युनिटच्या उभारणीमुळे गिरणारेसह पंचक्रोशीतील नागकिरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऑक्सिजनअभावी होणारी परवड थांबण्यास मदत
गिरणारे ग्रामीण रुग्णालयात खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून आणि नाशिक येथील बांधकाम व्यावसायिकांच्या योगदानामुळे स्वंयमनिर्मित ऑक्सिजन युनिट उभाण्यात आले आहे. या युनिटमुळे रुग्णांची ऑक्सिजनअभावी होणारी परवड थांबण्यास मदत होणार आहे. या युनिटमुळे जवळपास २५ रुग्णांना चोवीस तास ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. मी खासदार गोडसे यांचे ग्रामस्थांच्यावतीने आभार मानतो.
तानाजी गायकर, उपसरपंच, गिरणारे (नाशिक)