गुरूवार, ऑगस्ट 7, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गाथा बलिदानाची – परमवीर चक्र प्राप्त सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल

by Gautam Sancheti
डिसेंबर 16, 2020 | 1:08 am
in इतर
0
IMG 20201215 WA0018

परमवीर चक्र प्राप्त सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल

जन्म : १४ ऑक्टोबर १९५० (पुणे, महाराष्ट्र)
वीरगती : १६ डिसेंबर, १९७१ (वय २१) (बारापिंड, शंकरगढ सेक्टर, भारत)
सैन्यशाखा : भारतीय सेना
हुद्दा : सेकंड लेफ्टनंट
सैन्यपथक : १७ पूना हॉर्सेस
युद्ध : बसंतरची लढाई, १९७१चे भारत पाकिस्तान युद्ध
पुरस्कार : परमवीरचक्र (मरणोत्तर)
सेकंड लेफ्टनंट अरुण क्षेत्रपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखविलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला.
सुनिल हटवार
सुनिल हटवार
प्रयोगशील शिक्षक, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
 पूर्वजीवन
अरुण क्षेत्रपाल यांच्या कुटुंबाला सैनिकी सेवेचा मोठा इतिहास आहे. त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल (नंतर ब्रिगेडियर) एम.एल. खेतरपाल भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनीयर्समध्ये अधिकारी होते. अरुण क्षेत्रपाल यांनी १९६७मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेतला. तेथून उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी भारतीय सैनिकी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. जून १९७१मध्ये त्यांना १७ पूना हॉर्सेसमध्ये तैनात केले गेले.
बसंतरची लढाई – पुलावर ताबा
सैन्यात गेल्यावर सहाच महिन्यात पाकिस्तानने भारतावर आक्रमण केल्यावर युद्ध सुरू झाले. त्यावेळी १७ पूना हॉर्सेस रेजिमेंटला ४७व्या इन्फंट्री ब्रिगेडबरोबर सीमेवर पाठविण्यात आले. तेथे त्यांना बसंतर नदीवरील पूलावर ताबा मिळविण्याचा हुकुम मिळाला. ४७ व्या इन्फंट्रीने पुलावर ताबा मिळविला तरी तेथील सगळा प्रदेश भूसुरुंगांनी व्यापलेला होता व त्यातून १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणणे धोक्याचे होते. कोर ऑफ इंजिनीयर्स हे सुरुंग निकामी करीत असताना त्यांना शत्रूचे रणगाडे जवळ येत असल्याची चाहूल लागली. ते कळल्यावर भारतीय रणगाडे तशाच परिस्थितीत सुरुंग चुकवीत पुलाजवळ दाखल झाले.
परमवीर चक्र
१६ डिसेंबरला सकाळी ८ वाजता पाकिस्तानच्या १३ लान्सर या रणगाड्याच्या डिव्हिजनने आपल्या नव्याकोऱ्या पॅटन रणगाड्यांनिशी भारतीय सैन्यावर चढाई केली. पूना हॉर्सेसच्या बी स्क्वॉड्रनवर हल्ला झाल्यावर त्याच्या सेनापतीने कुमक मागवली. क्षेत्रपाल आणि ए स्क्वॉड्रनमधील काही रणगाडे टाकोटाक त्यांच्या मदतीला धावले. १७ पूना हॉर्सेसचे रणगाडे आणि ४७व्या इन्फंट्रीचे सेनापती हनुत सिंग राठोड यांनी पहिला हल्ला कापून काढला. शत्रूने दोन स्क्वॉड्रन एकदम भारतीय सैन्याच्या अंगावर घातल्या आणि फळी फोडत पुढे येण्यास सुरुवात केली. क्षेत्रपाल आणि त्यांचा सहकारी रणगाडा सरसावले आणि त्यांनी पाकिस्तान्यांची ही चाल रोखून धरली. संपूर्ण स्क्वॉड्रनशी दोन हात करताना खेतरपालच्या सहकारी रणगाड्याचा सरदार कामी आला. एकट्या पडलेल्या क्षेत्रपालच्या रणगाड्यानी लढाई सुरूच ठेवली आणि पुढे येत असलेल्या पाकिस्तानी सैनिक आणि रणगाड्यांवर थेट चाल केली आणि एक रणगाडा तोडून पाडला. इतक्यात सरदार गमावलेल्या रणगाड्यानेही क्षेत्रपालना साथ दिली. हबकलेला शत्रू थोडा मागे होउन परत नव्या दमाने चालून आला. भारतीय रणगाड्यांनी मागे न हटता एकामागोमाग एक असे दहा पाकिस्तानी रणगाडे फोडून काढले. भारताचा दुसरा रणगाडा यात कामी आला. आता क्षेत्रपालचा एक रणगाडा विरुद्ध पाकिस्तानची संपूर्ण स्क्वॉड्रन अशी लढाई सुरू झाली. असंख्य तोफगोळे आणि मशिनगनच्या माऱ्याने क्षेत्रपालचा रणगाडा हतबल झाला आणि क्षेत्रपालांसह रणगाड्यातील चारही सैनिक गंभीर जखमी झाले. रेडियोमन सवार नंद सिंग हे रणगाड्यातच मृत्यू पावले. चालक सवार प्रयाग सिंग आणि तोफचालक सवार नथु सिंग यांच्यासह जागचा हलू न शकणाऱ्या रणगाड्यातून क्षेत्रपाल यांनी तुफान मारा चालूच ठेवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रेडियोवरुन त्यांना रणगाडा सोडण्याचा हुकुम दिला असता त्यांनी उत्तर दिले – नाही, मी माझा रणगाडा सोडून पळणार नाही. माझी मुख्य तोफ अजून चालू आहे अन मी त्या ****ना पाहून घेतो. त्यानंतर ते एकामागोमाग पाकिस्तानी रणगाड्यांचा वेध घेत राहिले. शेवटी एकच शत्रू उरला व तो १०० मीटर वर येउन ठाकला. दोघांनीही एकाच वेळी तोफांचा मारा केला. यात दोन्ही रणगाडे निकामी झाले आणि क्षेत्रपाल मृत्यू पावले. त्याआधी त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवत पाकिस्तानचे डझनावर रणगाडे उडवले आणि पाकिस्तानची व्यूहात्मक चाल उधळून लावली होती. क्षेत्रपाल यांनी दाखविलेल्या या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.
युद्धानंतर
क्षेत्रपाल यांचा रणगाडा फामागुस्ता शत्रूने काबीज केला. नंद सिंग आणि क्षेत्रपालांचे मृतदेह शत्रूने नंतर परत केले. त्यांच्यावर १७ डिसेंबरला अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या शौर्याची व मृत्यूची बातमी २६ डिसेंबरपर्यंत कळली नव्हती. युद्धानंतर पाकिस्तानने फामागुस्ता भारतीय सैन्याला परत केला व आता तो संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. प्रयाग सिंग आणि नथु सिंग हे दोघेही जबर जखमी झाले आणि पाकिस्तानच्या हाती पडले. युद्धानंतर ते भारतास परतले व कॅप्टनच्या मानद हुद्द्यावरुन ते सैन्यातून निवृत्त झाले.
अशा या शूर अधिकाऱ्यास सलाम…जय हिंद….
लेखमाला e1607869782148
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

श्यामची आई संस्कारमाला – क्षमेविषयी प्रार्थना – कृतीयुक्त खेळ

Next Post

नेदरलँडमध्ये हार्ड लॉकडाउनची घोषणा; ख्रिसमस साजरा होणार निर्बंधातच

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
EZ yq9IXYAE59OH

नेदरलँडमध्ये हार्ड लॉकडाउनची घोषणा; ख्रिसमस साजरा होणार निर्बंधातच

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 8

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या समुद्राखालील ७ किमी लांबीच्या मार्गाच्या कामाला प्रारंभ…

ऑगस्ट 7, 2025
प्रातिनिधिक फोटो

सिंहस्थ कुंभ मेळा…नाशिक जिल्ह्यात ३९३ कोटी रुपये खर्चाचे १८ रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलांना मंजूरी

ऑगस्ट 7, 2025
fir111

अमली पदार्थाची विक्री करणारा प्लेडर पोलीसांच्या जाळयात…५.५ ग्रॅम वजनाचे एमडी सदृष्य अंमलीपदार्थ जप्त

ऑगस्ट 7, 2025
Paytm Raksha e1754530011544

रक्षाबंधनाकरिता पेटीएमने दिले हे सहा गिफ्टिंग पर्याय…बघा, संपूर्ण माहिती

ऑगस्ट 7, 2025
मंत्री जयकुमार गोरे सरपंच यांची बैठक 1 1024x683 1

राज्यात या तारखेपासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान….गावाच्या विकासासाठी मोठी संधी

ऑगस्ट 7, 2025
कॉफीटेबल बुक प्रकाशन 1024x683 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘महावस्त्र पैठणी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

ऑगस्ट 7, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011