कल्पना दत्ता (भारतीय क्रांतिकारक)
जन्म : २७ जुलै, १९१३ (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)
मृत्यु : ८ फेब्रुवारी १९९५ (कलकत्ता, पश्चिम बंगाल)
इतर नाव : कल्पना जोशी
पती : पूरन चंद जोशी
नागरिकता : भारतीय
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
तुरुंगवा : फेब्रुवारी १९३४ मध्ये २१ वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.
अन्य माहिती : सप्टेंबर १९७९ मध्ये कल्पना दत्ता यांना पुण्यात ‘वीर महिला’ या उपाधिने सम्मानित केले गेले.
- कल्पना दत्ता (नंतर कल्पना जोशी) या एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होत्या. सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाल्या. त्यानंतर त्यांनी पुरणचंद जोशीशी विवाह केले. त्यानंतर कल्पना दत्ता १९४३ साली भाकपची अध्यक्षा झाल्या.
सुरुवातीचे जीवन
कल्पना दत्ताचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, त्यांनी कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच त्या विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाल्या. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.
सशस्त्र चळवळ
चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या ‘भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाल्या. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने कल्पनाला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच कल्पना दत्ताला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्या सुनावणीत कल्पना दत्ताला शिक्षा झाली. १९३९ मध्ये त्यांची सुटका झाली.
नंतरचे जीवन
कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाल्यानंतर त्या भाकपच्या सदस्या झाल्या. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. यावर आत्मकथात्मक पुस्तकही त्यांनी लिहले आहे. चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये त्यांनी बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी त्यांचा म्रुत्यू झाला.
वैयक्तिक जीवन
कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.
चित्रपट
चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये ‘खेले हम जी जान से’ हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पना दत्ताचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला ‘चितगांव’ हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.
संकलन : सुनिल हटवार ब्रम्हपुरी,
चंद्रपूर 9403183828