लढाऊ हेलिकॉप्टर वैमानिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी हा १३ महिन्यांचा असतो. २००३ साली स्थापन झालेल्या या प्रशिक्षण केंद्रातून आतापर्यंत शेकडो लढाऊ वैमानिक देशसेवेत दाखल झाले आहेत. मंगळवारी झालेल्या सोहळ्यात अतिथी मेजर जनरल अजयकुमार सुरी हे खास बग्गीतून एअरफील्ड मैदानावर दाखल झाले. ३३ वैमानिकांनी यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केले.
कॅप्टन अमितकुमार दहिया, असद अहेमद, आयुष कावटीयाल, विक्रमजीतसिंग, शुभम शुक्ला, मधुर दुबे, शंकर बी, विकास चौहान, शुभम ढिल्लोरे, रोहितसिंग यादव, अजयप्रकाश, यांच्यासह ३३ वैमानिकांना गौरविण्यात आले.
—–
विजेते
१.कॅप्टन सचिन गुलीया- फ्लेजिंग ट्रॉफी
२.कॅप्टन दिवाकर- पी के गौर स्मृतीचषक
३. कॅप्टन प्रभुदेवन – एअर ओबीसर्वएशन
४. कॅप्टन तारीफ सिंग – एस के शर्मा स्मृतीचषक
५. कॅप्टन संतोषकुमार – अष्टपैलू कामगिरीसाठी मानाची ‘सिल्व्हर चित्ता’ ट्रॉफी पटकाविली.
——
तुमचं ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी महत्वाचे- मेजर जनरल अजयकुमार सूरी-
युवा लढाऊ वैमानिकांचे मी अभिनंदन करतो. तुमचं ज्ञान आणि कौशल्य हे कुठल्याही ऑपरेशनच्या वेळी महत्वाचे ठरते. तुम्ही तुमच्या तंत्रज्ञानाचा अचूक वापर जेव्हा करतात तेव्हा तुम्ही विजयश्री प्राप्त करता. युद्धभूमीवर आपली भूमिका फार महत्वाची असते. भूदालावरील सैनिकांना अत्यावश्यक रसद पुरविण्यापासून आपत्कालीन रेस्क्यू पर्यंत सर्व कामगिरी करावी लागते. कुठल्याही भौगोलिक परिस्थितीत लढाऊ वैमानिक हे स्वतःच्या कौशल्याधारे सुरक्षित उड्डाण करत सैनिकांना सर्वोतोपरी मदत देतात. येथील केंद्राने उत्कृष्ट लढाऊ वैमानिक आतापर्यंत देशाला दिले आहेत. हे या केंद्राचे वैभव आहे.