नाशिक – जिल्हा परिषद शाळा, चाटोरी (ता. निफाड) येथील गरीब विद्यार्थ्यांना सोशल नेटवर्कींग फोरमच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी अनेक शिक्षक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून विद्यार्थ्यांना गावातील सार्वजनिक ठिकाणी, घरांच्या ओट्यांवर, शेतात झाडाखाली बसवून शिकवत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना फोरमच्या वतीने साथ देण्याचा छोटासा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच फोरमने विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तक, पेन्सिल, रबर, कंपास बाॅक्स, पेन्स आणि अन्य शालेय साहित्य जमा करण्याचे काम सुरू केले आहे. या उपक्रमात सहभागी व्हावे आणि शैक्षणिक साहित्य द्यावे, असे आवाहन फोरमचे प्रमोद गायकवाड, राकेश दळवी आदींनी केले आहे. अधिक माहितीसाठी नाशिक ९४२२७६९३६४, पेठ तालुका ७५८८०१३७०९, त्र्यंबकेश्वर तालुका ८५५१८२०९६१, सुरगाणा तालुका ९६८९६४७१३८, नाशिक तालुका ९४२१६०९९८७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.