नाशिक – गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या नाशिक ते शेगाव सायकलवारीचे आज भांड न्यूज पेपर एजन्सी डीजीपीनगर क्रमांक २ अंबड, नाशिक येथून प्रस्थान झाले. नाशिक ते शेगाव ४५० किलोमीटर अंतर रोज ११० किलोमीटरप्रमाणे चार दिवसांत पूर्ण करणार आहेत, मालेगाव, पारोळा, मुक्ताईनगर, शेगाव. ६ जानेवारी रोजी गजानन महाराजांचा जयजयकार करत सायकलवारी संतनगरी शेगावात पोहोचणार आहे. गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेली ही सायकल री आता रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. भक्तिमार्गातून पर्यावरण संवर्धन, पाणीबचत, अन्नाची नासाडी, बेटी बचाव, वृक्षसंपदा यासह सामाजिक विषयाचे प्रबोधन करत या वारीची वाटचाल सुरू असल्याचे सायकलवारीचे संस्थापक प्रल्हाद (अण्णा) भांड यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनाचा त्याग करत पेट्रोल बचतीचा संदेश देत सायकल चालवण्याचे आरोग्याला किती महत्त्वाचे आहे हेच यातून साध्य होते. यंदा ३८ वारकऱ्यांचा समूह जात असून, सर्व शासकीय नियमांचे पालन करत अत्यंत शिस्तबद्ध असणारी ही सायकलवारी शेगावात पोहोचणार आहे. भक्तीला विज्ञानाची जोड देत वारीची वाटचाल चालू आहे. वारी प्रस्थानाच्या वेळी नाशिक -शेगाव सायकलवारीचे संस्थापक प्रल्हादअण्णा भांड, संत निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचे पालखीप्रमुख पुंडलिकराव थेटे, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अरुण भांड, दगू नाना थेटे आदी उपस्थित होते.
यावर्षी सायकलवारीत प्रल्हाद भांड यांच्यासह दिलीप देवांग, अविनाश दातीर ,विजय चौधरी, संजय जाधव, अनिल भवर, अक्षय तगरे, राहुल उकाडे, भूषण सहाने, राजेंद्र भांड, नारायण सुतार, शरद सरनाईक, अरुण शिंदे, अनिल भावसार, आबासाहेब जाधव, मुकेश कानडे, सुधाकर सोनवणे, पांडुरंग पाटील, राकेश धामणे, राजेंद्र खानकरी, महेश थेटे, प्रकाश देशपांडे, ऋषिकेश नांदुरकर, प्रदीप रसलपूरकर,पुण्यश्री भांड, अनुजा खाटेकर, श्रद्धा बूब, सायली अमृतकर, विशाखा सरनाईक आदींसह ३८ जण सहभागी आहेत यावर्षीच्या सायकलवारीचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक सायकलला पुढे व मागे वेगवेगळ्या सामाजिक संदेश देणाऱ्या पाट्या लावल्या आहेत. जसे सर्व धर्माची एकच शिकवण, पर्यावरणाचे करूया रक्षण, अंगणी लावा तुळस प्राणवायूचा होईल कळस, बेटी बचाव, बेटी पढाव, कॅर बॅगचा मोह टाळा कापडी पिशवी वापरा, जय जवान, जय किसान, यांसह विविध संदेशाच्या पाट्या लावल्या आहेत. या सायकलवारीचे राज्यभरात वेगळेपण टिकून आहे. या सायक वारीला तपोवनातील संत जनार्दनस्वामी आश्रमाचे महंत माधवगिरीजी महाराज, बडा लक्ष्मीनारायण मंदिराचे महंत रामसनेहीदास महाराज, कैलास मठाचे स्वामी सवितानंद सरस्वती यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गजानन महाराज भक्त मंडळाचे रमाकांत दातीर, शुभम मटाले, मनोज दातीर, भाऊसाहेब थेटे, सीताराम भांड, दिलीप भांड आदींनी परिश्रम घेतले.