चांदवड – कोविडच्या साथीच्या रोगाचा पादुर्भावामुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थिताचा विचार करता यावर्षी श्री गणेश विर्सजन साध्या पध्दतीने साजरा करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यादृष्टीने सर्व चांदवड शहरातील नागरिकांनी खालील नियमांचे व सूचनांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन चांदवड पोलिस व नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
अशा आहे सूचना
– सर्व नागरिकांनी श्री गणेश विसर्जन हे आप – आपल्या घरच्या घरी करावे.
– सर्व नागरिकांनी विसर्जन करुन श्री. गणेशांची मुर्ती ही नगरपरिषदेतर्फे उपलब्ध करून दिलेल्या संकलन केंद्र किंवा फिरत्या पिकगाडी कमांक MH – 15 835477 , MH 15 G 6518 , MH – 15 8/1281 , MH15 CK 0916 मध्ये दान करावी. आपण दान केलेली मुर्ती प्रशासनाचे माध्यमातून नैसर्गिक श्रोत ( उदा रंगारी तलाव , खोकड तलाव , रागुड धरण ) या ठिकाणी विसर्जित करण्यात येईल. कोणत्याही नागरिकांनी नैसर्गिक श्रोत रंगारी तलाव , खोकड तलाव , राहुड धरण , तिसगांवरोड तलाव या ठिकाणी श्री गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी वैयक्तिकरित्या जावू नये. तसे निदर्शनास आले तर सदर इसमांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल .
– चांदवड नगरपरिषद तर्फे आठवडे बाजार, गाडगेबाबा चौक, डावखरनगर मातोश्री हॉस्पीटल जवळ , ,चांदवड बस स्टॅन्ड, रंगमहाल , वरचेगांव मुरुडेश्वर मंदिर इत्यादी ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात आले आहे .
– कोणीही संकलन केंद्रावर किंवा विसर्जन ठिकाणी आरती करणार नाही किंवा मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करणार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवून आपली मुर्ती संकलन केंद्रात दान करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.
नियमाचें कोविड -१ ९ व्या अनुषंगाने पालन न झाल्यास जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) अन्वये आदेशाचे उल्लंघन म्हणून कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. वरील सुचनाचे पालन करुन नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत यांनी केले आहे.