नाशिक – कोरोनाच्या संकटकाळात गणेश विसर्जनासाठी गर्दी करु नये, असे आवाहन वारंवार केले गेले असले तरी त्यास फाटा देण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ऑनलाईन अपॉईंटमेंट घेऊन नाशिककरांनी वेळेवर विसर्जनास यावे, अशी सुविधा महापालिकेने केली होती. मात्र, त्यास नाशिककरांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. परिणामी, शहरातील सर्वच कृत्रिम तलाव आणि गणेश विसर्जन स्थळ येथे विसर्जनासाठी नाशिककरांनी गर्दी केल्याचे पहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन फारसे झाले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.