कोडे क्रमांक ३
एका २७ अंकी संख्येतील २६ अंक समान असून केवळ चौदावा अंक तीन आहे.
जर त्यासंख्येला ११ ने निशे:ष भाग जात असेल तर त्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज किती?
कोडे क्रमांक १ चे उत्तर
* अबकड ही संख्या २५०० पेक्षा मोठी नाही. म्हणून ‘अ ‘ च्या जागी २ हा अंक असेल.
* बे चोक आठ, म्हणून ‘ ड ‘च्या जागी ८ हा अंक असेल.
* ‘ ब ‘ च्या जागी १ पेक्षा मोठा अंक नाही. म्हणून ‘ ब ‘ च्या जागी १ हा अंक आहे.
अंतिम उत्तर २१७८ × ४ = ८७१२.
[ अ=२; ब=१; क=७ आणि ड =८°]