नमस्कार,
शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर प्रशासनिक सेवेत जाण्यासाठी किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची ची निवड करताना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना (किंवा प्रवेश परीक्षांना )सामोरे जावे लागते. बहुतेक सर्व स्पर्धा (किंवा प्रवेश) परीक्षांसाठी गणित विषयाचे अध्ययन अनिवार्य असते. त्या परिक्षांमधील बहुतेक सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतात आणि ते सामान्यतः पारंपरिक स्वरूपाचे असतात.
ते प्रश्न सोडवण्यासाठी गणितातल्या काही युक्त्या माहित असाव्या लागतात, आकडेमोड झटपट आणि अचूकपणे करावी लागते. त्यासाठी गणिती कोडी सोडविण्याचा सराव करावा लागतो.
गणिती कोडी सोडविताना संपादित केलेल्या गणिती संकल्पनांचे उपयोजन अल्पावधीत करता यावे लागते. गणित-कोडी सोडवल्यामुळे मनोरंजनही होते आणि आकडेमोडीच्या आत्मविश्वासही ही प्राप्त होत असतो. गणित कोडी सोडविताना तर्कशास्त्र उपयोग करावा लागतो आणि त्याचा उपयोग मानसिक क्षमता चाचणीचे प्रश्न सोडवण्यासाठी ही होत असतो. म्हणून सर्वसामान्य बौद्धिक उन्नतीसाठी गणित कोडी सोडवण्याचा सराव उपयुक्त ठरत असतो.
गणित कोडे क्रमांक 2
एक दोन अंकी संख्या च्या दुपटी मध्ये दोन मिळविली असता त्या संख्येतील अंकांची उलटापालट होते तर ती दोन अंकी संख्या कोणती?
[(क्षय × 2) + 2] = यक्ष
तर ‘क्षय = ?’
(उत्तर – दर एक दिवसाआड)
(गणित कोडे क्रमांक १ चे उत्तर उद्या)
Very nice