नमस्कार,
आपणास माहित आहे की गणित विषयाला खूप मोठी भारतीय परंपरा आहे. भारतात वेद वांग्मय कधी निर्माण झाले ते निश्चितपणे सांगता येत नाही. त्यांच्या निर्मिती कालावधी बद्दल अनेक मतमतांतरे असली तरी अनेक वर्षांपासून हे साहित्य अस्तित्वात आहे याबद्दल दुमत होणे संभवतच नाही. यासंदर्भात आपण पुढील श्लोक लक्षात घेऊ.
यथा शिखा मयुराणाम नागाणाम मणयो यथा ।
तद्वद वेदांगशास्त्रेण गणितंम मुर्धनि स्थितम् ।।
इंग्रजीत असे म्हटले जाते की, ‘Mathematics is a queen of all sciences.’ गणितातील अनेक संकल्पना भारताने जगाला दिलेल्या आहेत हे आता सर्वमान्य सत्य आहे. म्हणून अनेक गणिती संकल्पनांची जननी भारतभूमी आहे याचा आपल्याला यथोचित अभिमान आहे.
या थोर भारतीय गणित परंपरेचा, काही गणितातील जमतींचा , थोर भारतीय गणितींचा आणि काही गणित कोड्यांचा परिचय गणित प्रेमींना व्हावा म्हणून आपण ‘रंजक गणित ‘ हे सदर सुरू करत आहोत.
हे सदर संवादी असणार आहे. म्हणजे या सदराच्या द्वारे वाचकांचे काही सूचना असतील किंवा काही अपेक्षा असतील तर त्यांचा समावेशही या सदरामध्ये विचारात घेतला जाणार आहे.
– दिलीप गोटखिंडीकर
गणित कोडे क्रमांक १
अ, ब, क आणि ड हे चार भिन्न शुंन्येतर अंक आहेत.
‘ अबकड ‘ या चार अंकी संख्येला चारने गुणले असता गुणाकार संख्या ‘ डकबअ ‘ मिळते.
[ अबकड × ४ = डकबअ]
तर ‘अबकड ‘ही चार अंकी संख्या कोणती?
(उत्तर दर एक दिवसाआड)
2178