कोडे क्रमांक ४
२५० चे वर्गमूळ आणि ३६० चे वर्गमूळ यांची बेरीज १००० च्या वर्गमुळापेक्षा कितीने जास्त आहे?
—
कोडे क्रमांक दोन चे उत्तर
* संख्येतील दशक स्थानचा अंक ‘ क्ष ‘
* संख्येतील एकक स्थानच अंक ‘ य ‘
* संख्या (१०क्ष + य )
*[(१० क्ष + य )× २] + २= १०य + क्ष
*१९क्ष + २ = ८य म्हणजे य = (१९क्ष +२)/८
* क्ष = २ असेल तर य = ५ म्हणून संख्या = २५.
– दिलीप गोटखिंडीकर, गणिततज्ज्ञ
(आता दर रविवारी भारतातील गणितज्ज्ञांची चरित्रकथा)