नाशिक – गणेश विसर्जनासाठी नाशिकला सकाळपासून सुरुवात झाली. नाशिक महापालिकेने शहरातील सहाही विभागात ठिकठिकाणी विसर्जनासाठी सुविधा केली त्यालाही प्रतिसाद मिळतो आहे. कोरोनामुळे प्रशासनाने याअगोदरच गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन करुन विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे त्याची दक्षताही घेतली जात आहे.
गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी गणेश मूर्ती दान करावी, निर्माल्य घंटागाडीतच द्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती असेल तर घरीच गणेश विसर्जन करायचे असल्यास अमोनियम बायकार्बोनेट महापालिकेकडून मोफत देण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांनी घरीच विसर्जन केले. त्याचे प्रमाणही जास्त आहे.