संकष्टी चतुर्थी
यंदा एकूण १३ संकष्टी चतुर्थी असणार आहेत. तर १२ विनायक चतुर्थी असणार आहेत. प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. तर शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्यामध्ये ३० दिवस म्हणजे तिथी असतात. त्यातील अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचे १५ दिवस याला शुक्ल पक्ष म्हणतात. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचे १५ दिवस त्याला कृष्णपक्ष म्हणतात. संकष्टी चतुर्थी व विनायक चतुर्थी या दोन्ही गणपती पूजनाशी संबंधित आहेत. आपल्या साध्या प्रमाणे गणेश भक्त संकष्टी अथवा विनायक चतुर्थी उपवास करतात. काही भक्त दोन्ही चतुर्थीला उपवास करतात.
कुठल्यातरी विशिष्ट उद्देशाने अथवा नवस म्हणून गदा या एकादशी केल्या जातात. एकादशी करताना ११ किंवा २१ अशा केल्या जातात. समस्या फारच मोठी असल्यास सव्वा वर्षे अथवा ५१ चतुर्थीचा नवस केला जातो. या दिवशी उपवास सोडताना चंद्रोदय यानंतर सोडला जातो.
आजचा चंद्रोदय हा रात्री नऊ वाजून १६ मिनिटांनी आहे.
चतुर्थी व्रत
स्त्री, पुरुष, मुले-मुली कुणीही करू शकतो. उपवास ठेवताना दिवसभरासाठी असतो. सायंकाळी चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. काही गणेश भक्त निरंकार उपवास करतात, तर काही फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खाऊन करतात. चतुर्थीच्या दिवशी गणेश दर्शन, गणपतीला २१ दुर्वांची जुडी, जास्वंद, लाल फुल वाहणे व गणपती आराधना करणे, अष्टविनायक दर्शन यास विशेष महत्त्व आहे.
विशेष नवस
प्रसंगी मिठाची चतुर्थी करण्याचा प्रघात गणेशभक्तांमध्ये पाहायला मिळतो. यामध्ये २१ मोदक करतात. त्यात २१ मोदक गुळ खोबऱ्याचे तर १ मोदक मिठाचा असतो. गणपतीला नैवेद्य दाखवल्यानंतर गणेश भक्त १/१ मोदक खाण्यास सुरुवात करतो. ज्याक्षणी मिठाचा मोदक लागेल तेथे मोदक खाणे थांबवले जाते. म्हणजेच उपवास सुटला असे मानले जाते. त्यानंतर कोणतेही अन्न ग्रहण केले जात नाही. उर्वरित मोदक घरातील मंडळींना वाटप केले जातात.
शंका
अनेक गणेशभक्तांमध्ये सिद्धिविनायक गणपती व नियमित गणपती मूर्ती ओळखणे बाबत शंका असतात. सिद्धिविनायक गणपती मुर्ती म्हणजे गणपतीची सोंड ही त्याच्या उजव्या बाजूला वळलेली असणे. तर नियमित पूजेची गणपती मूर्ती म्हणजे ही सोंड डाव्या बाजूला असते, असा फरक असतो. सिद्धिविनायक प्रकारातील गणपतीची व्रतवैकल्ये तसेच पूजा, नैवेद्य पद्धती, आरतीच्या वेळा पाळणे हे नियम अतिशय कडक असल्याने सध्याच्या काळामध्ये ती पाळणे शक्य होत नाही. त्यामुळे सिद्धिविनायक मूर्तीची प्रतिष्ठापना फक्त मंदिरांमध्ये करतात. याच कारणाने वास्तुशांती वेळी मुख्य दरवाजावर लावली जाणारी गणपतीची प्रतिमा ही देखील सिद्धिविनायक प्रकारातील लाऊ नये. दिवसभर उपवास ठेवल्यानंतर सायंकाळी चंद्रोदय यानंतर उपवास सोडला जातो.
यंदाच्या चतुर्थी
संकष्ट चतुर्थी अशा
२ व ३१ मार्च
३० एप्रिल
२९ मे
२७ जून
२७ जुलाई
२५ ऑगस्ट
२४ सप्टेंबर
२४ ऑक्टोबर
२३ नोव्हेंबर
२२ डिसेंबर.
विनायक चतुर्थी
१५ फेब्रुवारी
१७ मार्च
१६ एप्रिल
१५ मे
१४ जून
१३ जुलै
१२ ऑगस्ट
१० सप्टेंबर
९ ऑक्टोबर
८ नोव्हेंबर
७ डिसेंबर