चांदवड- मागील वर्षीच्या दिवाळी अंकाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर गझल मंथन साहित्य संस्था यावर्षी “गझल अमृत दिवाळी विशेषांक – २०२०” प्रकाशित करीत आहे. यासाठी मराठी गझलकारांनी आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
या दिवाळी विशेषांकात मान्यवर गझलकारांचे गझलेविषयी मार्गदर्शनपर लेख आणि सदाबहार गझला असणार आहेत. त्यासोबतच नवोदित गझलकारांनाही या दिवाळी विशेषांकात स्थान दिले जाणार आहे. तरी इच्छुकांनी आपल्या उत्तमोत्तम दोन तंत्रशुद्ध गझला टाईप करून ३१ ऑगस्ट, २०२० पर्यंत पोहोचतील या बेताने पाठवाव्यात. गझल मोबाईलवर टाईप केलेली असावी. गझल टाईप केलेले फोटो, पीडीएफ किंवा लिखित स्वरूपातील गझल पाठवू नये. ज्यांना या दिवाळी अंकासाठी गझल पाठवायच्या आहेत त्यांनी आपल्या दोन गझल पाठवाव्यात. आलेल्या गझलांपैकी तंत्रशुद्ध व निर्दोष गझल दिवाळी विशेषांकासाठी स्विकारण्यात येईल. दिवाळी अंकात गझल प्रकाशित करण्याचे वा गझल नाकारण्याचे सर्व अधिकार कार्यकारी संपादकांना आहेत. गझल अमृत दिवाळी विशेषांक ८ नोव्हेंबर, २०२० रोजी प्रकाशित होणार आहे. दिवाळी विशेषांकाची नोंदणी सुरू आहे. आपली प्रत आजच बुक करा. या दिवाळी विशेषांकाचे कार्यकारी संपादक गझलकार डाॅ. शिवाजी काळे, गझलकार प्रमोद खराडे, आणि गझलकारा डाॅ. स्नेहल कुलकर्णी आहेत. तसेच व्यवस्थापकीय संपादक म्हणून गझलकार निलेश कवडे काम पाहणार आहेत. तरी इच्छुकांनी आपल्या गझल *गझल मंथन* साहित्य संस्थेचे उपाध्यक्ष गझलकार देवकुमार गुमटकर यांच्या ८८०६३६०७०९ या नंबरवर पाठवाव्यात. दिवाळी विशेषांकाविषयी अधिक माहिती साठी गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष गझलकार अनिल कांबळे – ९०२९२५५४५२ यांच्याशी संपर्क साधावा. गझल अमृत दिवाळी विशेषांकांसाठी गझल पाठवून जास्तीत जास्त मराठी गझलकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव गझलकार जयवंत वानखडे, आणि संस्थेच्या सहसचिव गझलकारा उमा पाटील यांनी केले आहे.