बंगळुरु – कर्नाटक विधानपरिषदेचे कामकाज सुरू असताना कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य प्रकाश राठोड हे मोबाईल फोनवर अश्लिल व्हिडीओ क्लिप पाहत असल्याचा दावा काही कन्नड वृत्तवाहिन्यांनी केला आहे. तसे फुटेज या वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले आहे. मात्र, राठोड यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
विधीमंडळ सभागृहाच्या कार्यकाळात, राठोड हे मोबाईल फोनमधील एक व्हिडिओ पाहताना दिसतात, असे वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केले होते. परंतु राठोड यांनी हा आरोप फेटाळून लावला असून त्यांनी सांगितले की, प्रश्नोत्तराच्या वेळी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी आपल्या मोबाईलवरील संबंधित फोटो व मजकूर पहात होतो आणि मोबाईल जागा भरल्यामुळे जॉम झाल्यावर फोनवरील काही सामग्री हटवत होतो . तसेच मी अशी कामे कधीच करणार नाही. दरम्यान, अशाच एका घटनेत २०१२ मध्ये तीन मंत्र्यांनी विधानसभा कार्यकाळात मोबाइल फोनवर अश्लील क्लिप पाहताना कॅमेर्यावर पकडले होते आणि त्यामुळे तत्कालीन भाजपा सरकारची मानहानी झाल्यानंतर तिन्ही मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.