नाशिक – शहर परिसरातील पर्यटनाला चार चाँद लावण्याची क्षमता असलेल्या गंगापूर धरणावरील बोट क्लबचे बुकींग सुरू झाले आहे. हे बुकींग आतापासूनच करता येणे शक्य आहे. कारण, हे ‘बुक माय शो’ या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गंगापूर बोट क्लब उद्यापासून (२२ डिसेंबरपासून) पर्यटकांसाठी खुला होणार आहे. येथील बोटींवर राईड करण्यासाठी ५३१ रुपयांपासून पुढे तिकीट आकारण्यात येणार आहे. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सोमवारी (२१ डिसेंबर) गंगापूर बोट क्लबसह अन्य पर्यटनस्थळांच्या विकासकामे आणि सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी या बोट क्लबच्या बोटींग सुरू करण्याचे निर्देश दिले. हा बोट क्लब पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला आहे.