नाशिक – गंगापूर धरणातून १००० तर नांदूरमध्यमेश्वर मधून १२ हदार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हंगामातील हा पहिलाच विसर्ग आहे. हे सर्व मराठवाड्याकडे जात आहे.
पाण्याचा विसर्ग कमी असल्यामुळे कुठेही पुराची शक्यता नाही. परंतु आज सुट्टीचा दिवस असल्याने कृपया कोणीही नदीपात्रात जाऊ नये. पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे धरण जवळपास ९४ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणातून रविवारी दुपारी १ वाजता ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. दुपारी ४ वाजेपर्यंत हा पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवत १००० क्युसेकपर्यंत करण्यात आला. पाण्याचा विसर्ग कमी असल्यामुळे कुठेही पुराची शक्यता नाही. परंतु आज सुट्टीचा दिवस असल्याने कृपया कोणीही नदीपात्रात जाऊ नये. पाण्याची पातळी अचानक वाढण्याची शक्यता आहे असे जाहीर आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली आहे.
पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे गेल्या काही दिवसापासूंन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. तसेच पूर परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आहेच. आपत्ती व्यवस्थापनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील सतर्क रहण्याच्या सूचना मांढरे यांनी दिल्या आहेत.
गंगापुर जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मागील आठ दिवसापासुन सलगतेने पाऊस पडत असल्याने गंगापुर जलाशयामध्ये आज ५१७३ द.ल.घ.फु. (५.१३ टि.एम.सी.) म्हणजेच ९१.८८ % पाणीसाठा झाला आहे. सद्यस्थितीत पाऊस असाच चालू राहिल्यास जलाशय परिचालन सुचीनुसार निर्धारीत पाणीपातळी व पाणीसाठा राखणेकरीता पुढील कालवधीत पुढील ४६ तासांत गोदावरी नदी मध्ये गंगापूर जलाशयात येणाऱ्या येव्यानुसार सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करावा लागतो. गोदावरी नदीकाठालगतच्या वाड्या, वस्त्यांमध्ये रहाणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदीपात्रात प्रवेश करु नये. आवश्यकता वाटल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतरीत व्हावे. तसेच नदीकाठालगतची इंजिने, विद्युत मोटारी, पशुधन ततसम साहित्य यांचेही सुरक्षेची योग्य ती काळजी घ्यावी असे जाहिर आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.