नाशिक – सतत वर्दळ असणाऱ्या नाशिकमधील गंगापूर रोडवर योगा, झुंबा, मनोरंजनपर कार्यक्रम, व्यायामाचे प्रकार, खेळ आणि मौजमजा करता येईल. असा विचार कधी कोणी केला आहे का? नाही ना हो पण हे शक्य आहे. नाशिक स्मार्ट सिटीच्या माध्यमातून आपणाला येथे योगासोबतच मनोरंजन आणि खेळाची मजा लुटता येणार आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5.30 ते 7.30 ही वेळ राखून ठेवा आणि थेट विद्या विकास सर्कल ते जेहान सर्कल या मार्गावर भेटा. आरोग्य उत्तम राहण्यासाठी व्यायाम आणि तणावमुक्त राहणं गरजेचं आहे. त्याचा विचार करता सायकल फॉर चेंज चॅलेंजला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर नंतर आता, स्ट्रीट फॉर पीपल चॅलेंजला सुरूवात झाली आहे. स्मार्ट सिटी मिशन, गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने, हे राबविण्यात येत आहे.