नाशिक – जगभरात २ नोव्हेंबर हा दिवस ऑल सोल्स डे म्हणून साजरा केला जातो. देवळाली कॅम्प परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी यावर्षी केवळ प्रार्थना व आपल्या पूर्वजांच्या सिमेट्रीवर सजावट करून मेणबत्या पेटवीत मिसा (प्रार्थना) केली. ख्रिस्ती बांधवांमध्ये मृत्यू झालेल्या आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो.
आपल्या पूर्वजांना स्वर्ग प्राप्त व्हावा. याकरिता येथे ज्यांची सिमेट्री उभारण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबियांसह नातेवाईकांच्या वतीने पवित्र ‘मिसा’ (प्रार्थना) अर्पण करण्यात आली. जगभरातील ख्रिश्चन बांधव २ नोव्हेंबर या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरण करीत असतात. येथील हिल रेंज परिसरात असलेल्या सेंट पेट्रीक्स रोमन व कॅथलिक ख्रिस्ती बांधवांसह कन्वर्टेड ख्रिस्ती बांधवानी यावर्षी अंत्यत साधेपणाने हा दिवस केवळ धार्मिक विधी पार पाडत साजरा केला.