नवी दिल्ली – तामिळनाडूमधील इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी (प्राप्तिकर विभाग) ख्रिश्चन प्रचारक आणि लेखकांच्या निवासस्थानांसह अन्य २५ मालमत्ता ठिकाणांवर छापा टाकला, यात सुमारे ११८ कोटी रुपयांची बेहिशोबी ऐवज आणि काळा पैसा सापडला आहे. या घटनेमुळे तामिळनाडूतील धार्मिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या पथकांनी २० जानेवारी रोजी एका खासगी विद्यापीठासह विविध ठिकाणी छापे टाकले असल्याची माहिती संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. काही राजकीय नेते, कार्यकर्ते, सनदी अधिकारी, उद्योजक यांच्याबरोबरच एका धर्मगुरूच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला.ख्रिस्ती धर्म प्रचारक पॉल दिनाकरन यांच्या कोयंबतूर येथील निवासस्थानी छापा टाकून आयकर विभागाने सुमारे साडे सात किलो सोन्याचे दागिने आणि काही रोकड जप्त केली आहे. दिनाकरन हे जिझस कॉल या नावाने ख्रिश्चन मिशनरी चालवत असून त्यात विविध प्रकारचे लोक सहभागी होतात. प्राप्ती कर अधिकाऱ्यांनी दिनकरन यांच्या मालकीच्या विविध ठिकाणाहून त्यांनी व त्यांच्या सहकारी मिशनऱ्यांनी मिळवलेल्या परदेशी देणग्यासह सुमारे ११८ कोटी रुपयांची रक्कम पकडली आहे.