ख्रिसमसचे पर्व
ख्रिसमसचा उत्सव संपूर्ण विश्वामध्ये खूप उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला ज्यांच्या उपदेशाच्या आधारावर इसाई धर्माची सुरुवात झाली. ख्रिसमस पर्वा मध्ये लोक एकमेकांना प्रेमाने भेटतात, त्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात आणि भेटही देतात. ख्रिसमस पर्वात आपल्याला येशू ख्रिस्ताला जाणण्याची संधी प्राप्त होते. येशू ख्रिस्तांचा मूळ संदेश हा प्रेमाचा संदेश आहे.
प्रभू प्रेम आहे, आपला आत्मा त्यांच्या प्रेमाचा एक किरण आहे. एका बाजूला प्रभू आणि मनुष्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला मनुष्य आणि प्रभूची सृष्टी यातील एक सूत्र प्रेम हे आहे. प्रेम जीवन आणि प्रकाशाच्या नियमाची पूर्णता करते.
चला, आपण विचार करूया, आपल्या जीवना मध्ये असे प्रेम झळकते का? काय आपण एकमेकांची प्रेमाने सेवा करतो का? ज्यांचे विचार आपल्यापेक्षा भिन्न असलेल्यांप्रती आपण त्यांच्याशी उदार तसेच सहनशील असतो का? काय आपण परमेश्वराच्या सर्व जीवसृष्टीवर प्रेम करतो का? तसेच आपण त्या सर्वांना आपले समजुन त्यांना जवळ करतो का? काय दलित लोकांविषयी आपल्या मनात दया आणि सहानुभूती आहे का? काय आपण आजारी तसेच पीडित लोकांसाठी प्रार्थना करतो का? जर आपण प्रेमाने राहत नसू तर, आपण प्रभू पासून दूर आहोत तसेच धर्मापासून ही दूर आहोत. भले आपण किती ही मोठ्या-मोठ्या गोष्टी करीत असू दे, भले आपण धार्मिक असू दे हा तर आपल्या या विचारांचा देखावाच करीत असतो.
संतांच्या मनात सर्वांविषयी प्रेम असते. ते लोकांविषयी त्यांचा रंग, राष्ट्र, धर्माच्या आधारावर कोणामध्येही भेदभाव करीत नसतात. त्यांच्या करिता कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतात. येशू ख्रिस्ताची इच्छा होती की लोकांनी केवळ त्यांचा संदेश न ऐकता, त्याप्रमाणे जीवन जगले पाहिजे. बरेच लोक ऐकतात परंतु फार थोडे ते समजतात आणि त्यातील पुन्हा फार थोडे आहेत की जे हे आचरणात आणतात.
येशू ख्रिस्तांच्या पवित्र जयंती निमित्त येशू ख्रिस्तांची शिकवण आपल्या जीवनात आचरणात आणावी. येशू ख्रिस्तांच्या म्हणण्यानुसार जर आपण जीवन जगायला लागलो तर निश्चित खऱ्या अर्थाने हे ख्रिसमस पर्व साजरे होईल.
वरील विशेष लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://indiadarpanlive.com/?cat=22