मुंबई – इजिप्तच्या जमिनीत बीयरचा सर्वांत जुना खजिना हाती लागला आहे. अमिरेका आणि इजिप्तच्या पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या एका बीयर फॅक्ट्रीला सर्वांत जुनी बीयर फॅक्ट्री असल्याचे बोलले जात आहे. इजिप्तमधील एका मुख्य पुरातत्व स्थळावरील ही जुनी फॅक्ट्री असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
प्राचीन वस्तूंच्या सर्वोच्च परिषदेचे महासचिव मुस्तफा वजिरी यांनी म्हटले आहे की ही फॅक्ट्री नील नदीच्या पश्चिमेकडील प्राचिन कब्रस्तान एबिडोसमध्ये मिळाली आहे. हे दक्षिण काहिरापासून ४५० किलोमीटर दूर आहे. ही फॅक्ट्री किंग नारमेरच्या क्षेत्रात आहे.
वजिरीने सांगितले की या उत्खननात आठ वस्तू मिळाल्या आहेत. यात मातीची जवळपास ४० भांडीदेखील मिळाली आहेत. अन्न आणि पाण्याचे मिश्रण गरम करण्यासाठी ही भांडी वापरली जाण्याची शक्यता आहे. या संयुक्त अभियानात अमेरिका आणि इजिप्त या दोन्हींचा सहभाग होता.
मिस्रच्या बळी प्रथांमध्ये बीयरच्या वापराचे पुरावे देणारा हा शोध असल्याचे सांगितले जात आहे. प्राचीन वस्तूंशी संबंधित ब्रिटनच्या पुरातत्व खात्याने १९०० च्या सुरुवातीला या फॅक्ट्रीच्या अस्तित्वाचा उल्लेख केला होता. मात्र उत्खनन केल्यास ते इथे उपलब्ध राहू शकते, याचा अंदाज त्यांना नव्हता.